पत्र
पत्र
पत्र मिळाले तूझे लेकरा....
लिहिले होते येईल लवकर
तुला भेटण्यास,मिठीत येण्यास
दोन घास प्रेमाने खाण्यास....
वाट बघत मी दाराशी बसले
हातात घेऊन ओवाळणीचे ताट
मना लागली तुझी आस....
मना लागली तुझी आस.
पत्र हाती आले जेव्हा
बरेच काही लिहिले होते
पण लक्ष त्या ओळीवर गेले
मुलगी बघण्यास जाऊ यंदा
मनातील तू ओळखले होते.
आंनद गगनात मावेना झाला
उत्तर तूझे ऐकून हे....
ये रे बाळा लवकर गावी
जाऊ मुलगी बघण्यास रे.
खूप काही बोलायचे आहे
शूर,पराक्रम,गाथा तुझीच
भरभरून ऐकायची आहे....
आला तो दिवस जवळ
तुझ्या येण्याची चाहूल लागली
मनात आस तूझी घेऊनी
दाराभोवती उभी राहिली....
धावत धावत आला समोर
मित्र,संगती तुझा जवळचा....
थरथरत्या हातांनी त्याने
सोपवले एक पत्र नवे....
वाचून त्यातील एक एक शब्द
रडले एका आईचे मन
अभिमान वाटला त्या क्षणीही
वाचुन शब्द विर मरन....
वाचुन शब्द विर मरन.
उलटुन गेले अनेक सत्र
ना बदलले आईचे मन....
कवटाळून त्या तुझ्या आठवणी
वाचते रोज शेवटचे पत्र....
करून तुझे स्मरण....
वाचते रोज शेवटचे पत्र
करून तुझे स्मरण.
