कॉलेज मधला पहिला दिवस
कॉलेज मधला पहिला दिवस
आठवतो तो पहिला दिवस
आठवणीत साठवलेला
नव्या नव्या चेहऱ्यांनी
वर्ग होता भरलेला
एक दोन होते ओळखीचे चेहरे
पण बाकी होते नवीन
दूर दुरून आलेले
होईल ना मैत्री सर्वांशी
करतील ना आपलंसं
असे प्रश्न मनात सारे
हळू हळू झालेत सर्वच जवळचे
नव्हते नात्यातले वाटेकरी
तरीही वाटतात सगळे आपलेसे
अनेक क्षण घालवले सोबत
कधी भांडलो,कधी रडलो
कधी हसलो तर कधी
चिडलो पण एकमेकांच्या
वाइट काळात सगळे
सोबत उभे राहिलो
काय असते मैत्री
याचा अर्थ खरा कळला
वाइट काळात साथ देत
जेव्हा हाथ पुढे केला
चार वर्षांचे नाते आज
वेगळे वळण घेऊन आले
दूर जाणार याची जाणीव
हेच दिवस करून गेले
माहित होतं कधी तरी
हा दिवस येणार
खूप साऱ्या आठवणी घेऊन
दूर सगळे होणार
एक नवीन आयुष्य सुरू करणार
आपापल्या वाटेने पुढे निघून जाणार
हळू हळू सर्वांमध्ये बदल घडत जाणार
पण सोबत घालवलेले क्षण मात्र
आठवणीत कायम तसेच राहणार.
