एकांत की एकटेपणा
एकांत की एकटेपणा
1 min
178
एकांत हवा असतो सर्वांना
एकटेपणा असतो जीवघेणा
एकांतात माणूस भटकत सुटतो
शांततेच्या जागी जावून बसतो
एकटेपणा हा जीवघेणा ठरतो
माणसा मधला माणूस मरतो...
बघता बघता एकांत हा
आपलीच माणसं दूर करतो....
विचारांचा त्यात काहूर माजतो
जगणे त्याचे नकोसे करतो...
ठाव घेवूनी या मनाचा
दूर दूर तो फिरून येतो....
एकटेपणा हा असाच असतो
एकांताचा अर्थ बदलतो...
स्वरूप देऊन एकांताचे माणूस
एकटेपणाला जवळ करतो.
