वृक्षसंवर्धन
वृक्षसंवर्धन
स्थिती पर्यावरणाची
गुणवत्ता घटलेली,
कृत्यामुळे मानवाच्या
परिस्थिती ढासळली..!!१!!
अवनती टाळण्यास
करू उपाय योजना,
प्रदूषण नियंत्रण
हीच आपली कामना..!!२!!
देऊ धडे जागृतीचे
संवर्धन करण्यास,
कार्यक्षम उपायाने
संतुलन राखण्यास..!!३!!
बदलले हवामान
धरतीचे तापमान,
जीवजंतू संघर्षात
हरपले आज भान..!!४!!
आहे मानवा आव्हान
हानी भरून काढणे,
कसा शोधेल उपाय
तीव्र बदल रोखणे..!!५!!
युवकांनो होऊ पुढे
नको नुसते रोपण,
चित्र बदलू या याचे
करू वृक्षसंवर्धन..!!६!!
