वर्ग फळा
वर्ग फळा
संख्या थोडी वाढलेली
डोकी जरा बदललेली
आज एक हसलेला
उद्या तोच विसरलेला
वर्ग फळा न्याहाळत
चार शब्द गिरवत
बेंच धरण्यास मारामारी
नवा पेन ढापणारी
आज उद्या सांभाळत
ज्ञान दान भरवत
गुरू तोच राहिलेला
एकच वाट धरलेला
होता जरा कडकच
मन मात्र हळवच
आज मज घडवून
गुरू जाई आनंदून
