STORYMIRROR

Sunita Ghule

Tragedy

3  

Sunita Ghule

Tragedy

वृध्दाश्रम

वृध्दाश्रम

1 min
427


इवले, इवले मनगट पकडून

जेव्हा पहिल्यांदा सोडले होते शाळेत

तु ओक्साबोक्शी रडत होतास नि

माझे काळीज होते पिळवटून निघत।


तुला तिथे एकटे सोडताना

मन माझे गहिवरले होते

पण तुझ्या उज्वल भविष्यासाठी

बाळा,मी सारे धीराने सोसले होते।


आजही मी तुझे मनगट पकडलेय

अंतरंगात भावनांचा कल्लोळ दाबून

नको रे असा दूर लोटूस मला

म्हातारपणात हक्काचा अाधार तोडून।


असा काय गुन्हा केला मी

शिकवून तूज शहाणे केले

वृध्दपकाळी एकाकी सोडून

पुत्राने मज अनाथ केले।


येशील का रे अंतिम समयी

तशी नेत्रांची ज्योत विझणार नाही

कुठेही रहा लाडक्या,तू सुखी

हा बाप तुला शाप देणार नाही।


मी तुला सोडले शाळेत

तुही सोडतो आहे वृद्धाश्रमात

फरक एवढाच.... मी तुझे भविष्य घडविले

तु मात्र मला चिरदु:खात बुडविले।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy