वंदन शिवबांना
वंदन शिवबांना
जय भवानी जय शिवराय
अशी करून गर्जना,
आज शिवजयंती दिनी
मी करतो वंदन शिवबांना..
थोर शूर वीर शिवबा सम
राजा ना झाला ना होणार,
आम्ही मावळे शिवबाचे शूर वीर
नाही मरणाला भिणार ,
अन्यायाची चिड आम्हा फार
देवू न्याय सकल जना...
शपथ शिवबाची आम्ही घेऊ
दीनदलीतांना न्याय देऊ,
जनकल्याणासाठी सदा
शिवबा सम धाव घेऊ
शिकवण शिवबाची स्वराज्याची
शूर वीर शिवबाचा बाणा..
गाऊ शिवबाचे गीत, पोवाडे
स्फुर्ती देती किल्ले,गड, राजवाडे
तलवार भवानी शिवबाची
भगवे निशाण हे फडफडे
आठवा पराक्रम तो शिवबाचा
करू जय शिव गर्जना...