STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

विविधतेत एकता

विविधतेत एकता

1 min
2.3K

आम्ही भारतीय लोक

विविधता इथे नांदे

भाषा पोषाख वेगळे

तरी आम्ही एक सारे


प्रांत वेगळे असती

भिन्न हवामान जरी

वेगळ्याच चालिरीती

मने एक झाली तरी


परंपरा श्रद्धास्थाने

जरी आगळ्यावेगळ्या

सर्व नमन पोचते

एका परमेश्वराला


चवी लज्जत पदार्थ

भिन्न प्रांत अनुसरे

बंधू भगिनीचे नाते

आम्ही सदा एक सारे


जेव्हा युद्ध गरजते

समभाव नांदतसे

एक लक्ष दिसतसे

त्वरे शत्रू टिपतसे


परदेशी निवासात

सण सर्वांचे साजरे

एक होती सर्व मने

भारतीय एक सारे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract