विठुराया
विठुराया


कर कटेवर घेऊन
ऊभा विठु सावला
जमला भक्ती चा
जणसागराचा मेळा ।।१।।
टाळ म्रुदुंगाचा गजर
आसमंती तो घुमला
गोल रिंगण करून
भक्त नाचात रमला ।।२।।
वारकरी आनंदाने सेवेत
पांडुरंग नामात दंगला
भान नाही राहिले कशाचे
सोहळा भक्ती चा नयनी पाहिला ।।३।।