STORYMIRROR

Shital Yadav

Inspirational

3  

Shital Yadav

Inspirational

विठ्ठल विठ्ठल

विठ्ठल विठ्ठल

1 min
27K


विठ्ठल माझा कृष्ण सावळा

कर कटीवरी,भाळी गंध टिळा


विठुरायाची ऐसी पावन पंढरी

आली नगरीत मंडळी वारकरी


विठुमाउलीचा सकलांना लळा

भक्त फुलविती भक्तीचा मळा


टाळ मृदंगाने अभंग दुमदमले

विठ्ठल नामाने भूमंडल व्यापले


सान थोर असा भेद इथे मिटे

दर्शनाने डोळ्यांचे पारणे फिटे


विठु चरणी जीव हा विसावला

पंढरीस येता आत्मा सुखावला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational