STORYMIRROR

Sant Namdev

Classics

2  

Sant Namdev

Classics

विठ्ठल आवडी प्रेमभावो

विठ्ठल आवडी प्रेमभावो

1 min
14.4K



विठ्ठल आवडी प्रेमभावो ।

विठ्ठल नामाचा रे टाहो ॥१॥


तुटला हा संदेहो ।

भवमूळव्याधीचा ॥२॥


म्हणा नरहरी उच्चार ।

कृष्ण हरी श्रीधर ।

हेंचि नाम आम्हा सार ।

संसार तरावया ॥३॥


नेघों नामाविण कांहीं ।

विठ्ठल कृष्ण लवलाही ।

नामा म्हणे तरलों पाहीं ।

विठ्ठल विठ्ठल म्हणतांचि ॥४॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics