विषय :- सांग विठ्ठला
विषय :- सांग विठ्ठला
सांग विठ्ठला माझ्या
बापाच चुकलं काय ,
बाप माझा तुझ्या दारी
बघ वारी करीत येतोय ||1||
गरिबांचा तू देवा
आहेस म्हणे वाली ,
मग माझ्या बापाची
काय रे चूक झाली ||2||
बाप नेहमी तुझीच
करतोय बघ पूजा ,
कारे बनवत नाही
त्याला जीवनाचा राजा ||3||
आभाळाकडं लागून डोळा
पावसाची पाहतोय वाट ,
मग का करीत नाहीस
देवा त्याची शेती दाट ...||4||
