विषय-प्रवास
विषय-प्रवास
निघाले गावाला कोयना एक्सप्रेसने
माझा छोटासा मुलगा अन् मी जोडीने
एक्सप्रेस झाली लेट मला आले रडू
आई बाबांच्या आठवणीने वाटले कडू
गावची शेवटची बस निघाली असेल
आई वाट पाहून डोळे गाळत असेल
वाईट मनात येवुन देवाला आळवित असेल
कुठेय तरुण पोर म्हणून काळजीत असेल
जायचे कसे आता मूळ मुक्कामावर
एकवटली हिम्मत विचार केल्यावर
गाडीतील एकाला विचारला त्याचा पत्ता
सोडाल का मला घरी देईन थोडासा भत्ता
माणूस होता भला सोडले भाऊ बनुन
पोहोचले आईच्या घरी कावरी होवुन
गळामिठी घातली निश्वासाने मी आईला
आठवले दिवसातल्या बिकट प्रसंगाला
देऊ केले पैसे त्या भल्या माणसाला
बोलला येईन घरी राखी बांधून घ्यायला
अजूनही आहे टिकुन माणुसकीचे नाते
नराधमांच्यामुळे पावित्र्य बिघडून जाते
