विषय : मराठी असे आमुची मायबोली
विषय : मराठी असे आमुची मायबोली
आमुची मायबोली मराठी
हीच आमची संस्कृती,
एकमेव अभिमानाची
मराठमोळी आकृती.!
अशी मराठी मायबोली
असे आमच्या रक्तात,
अभिमान बाळगून
सदैव आमच्या मनात.!
मराठीचा प्रत्येक शब्द
असे एवढा गोडं,
आस्वाद त्याचा लागे
जसे आंब्याची फोड.!
मराठीचा हा झेंडा
लागे सर्व परिसरात,
गर्व वाटे मनी तेव्हा
प्रेम वाढे हृदयात.!