STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Classics

3  

Neha Ranalkar(Nawate)

Classics

*विषय:- झेंडू*

*विषय:- झेंडू*

1 min
584

रंग केशरी पिवळा

हळदूला कधी माझा |

झेंडू घरोघरी दिसे

सण येता मीच राजा | |१| |


सुवासिक फुले माझी

देठ हिरवा खुलतो |

दिसे छान माझे शेत

मीच हर्षाने फुलतो | | २| |


मला येता भाव जरा

गरीबांचा जातो जीव |

त्यांची अवस्था पाहून

येते मला त्यांची कीव | |३| |


आणा फुले घरी माझी

बांधा तोरण दारास |

माझ्याविना शक्य नाही

घरा पुढील आरास | |४| |


झेंडूची फुले प्रत्येक सणाला घरोघरी लावण्याची पद्धत आहे. दाराला तोरण, देवतांना हार व पुजा झेंडू शिवाय पूर्ण होत नाही. अशा केशरी, हळदुल्या रंगाच्या झेंडूची शेती शेतकरी दोन पैसे मिळावेत यासाठी करतो पण गरीबांना ते विकत घेऊन या खरेदी करण ही बाब अशक्य असते हेच विचार या कवितेतून मांडले आहेत. 



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics