STORYMIRROR

Padmakar Bhave

Classics Inspirational

4  

Padmakar Bhave

Classics Inspirational

सूर

सूर

1 min
309

गहन गर्तेत असतात

काही स्वर..

जात नाहीत निघून

किंवा विरतही नाहीत

वाऱ्यावर!


घुमत असतात स्वर...

शांत...निश्चल..तरलपणे

अलौकिकाच्या गाभाऱ्यात!


पुन्हा येतातच फिरून

मनाच्या मैफिलीत

व्योमाची प्रदक्षिणा करून!

....सूर कुठ्ठे कुठ्ठे जात नाहीत.


सूर असतात ... 

रक्तात विरघळलेले,

आद्यांताच्या फेऱ्यात

न अडकलेले!

सुरांचे आयुष्य म्हणजे-

आयुष्याच्याही पलीकडीले!

....सूर कुठ्ठे कुठ्ठे जात नाहीत.


पुन्हा रुजत जातात..

त्याच मातीत,

फुलत-बहरत जातात

त्याच मातीतून-

स्वरांच्या सुरपारंब्या!


नसतं त्यांना मरण!


काही स्वर लेवूनच येतात अमरत्वाचं लेणं..!


असतात काही स्वर..

असिम पयोधी स्वरूप,

चैतन्य तटीनी रूप,

तळहाताच्या खळग्यातले

तीर्थरूप!!


....सूर कुठ्ठे कुठ्ठे जात नाहीत...!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics