संत गाडगेबाबा
संत गाडगेबाबा
वैज्ञानिक दृष्टी || ज्यांची सर्वकाळ||
किर्तनाची माळ || जपणारे ||१||
गाडगे बाबा हे || कर्मयोगी संत||
विचार श्रीमंत || हितकारी ||२||
साधी ती रहाणी || गावोगावी वाटा||
हातात खराटा || असे सदा ||३||
संदेश सर्वांस || स्वच्छतेचा ध्यास||
मनी त्यांच्या खास || असे सदा||४||
किर्तनात त्यांच्या || लोक प्रबोधन||
सुंदर वचन || वाणीतून ||५||
सुधारणावादी || विचारांची माळ||
देती सर्वकाळ || किर्तनात ||६||
माणसात देव || सांगणारे संत||
कुप्रथेचा अंत || करणारे ||७||
आयुष्यात केली || दुबळ्यांची सेवा||
माणुसकी ठेवा || सांगितले ||८||