विषय: गे माय भू
विषय: गे माय भू
गे माय भू भारतदेशा तुझ्या
ऋणामध्ये राहील मी मरेपर्यंत |
तुझ्या उपकारांची जाणीव मज
देशसेवा अंतिमश्वास सरेपर्यंत | |१| |
माझ्या या शब्दांनी मी वाहीन
सुमनांजली प्रीतिची सदैव तुला |
तुच माझी भारत माता माय-भू
हा जन्मच तव चरणी मी वाहिला | |२| |
तुझ्या मातीचा शोभे मज भाळी
सुंदर टिळा जाता समरांगणी |
बोलतो जय हिंद जय भारत माते
शोभते तुच जगाच्या नभांगणी | |३| |
माय भू पून्हा जन्म मिळावा
नागरिकाचा भारत देशामध्ये |
भिनली नसानसात देशभक्ती
संचारते रक्त लढण्या त्वेषामध्ये | |४| |
