STORYMIRROR

Shashikant Shandile

Inspirational

2  

Shashikant Shandile

Inspirational

विसरुनी जा तू

विसरुनी जा तू

1 min
14.1K


विसरुनी जारे विसरुनी जा तू दूख जीवनाचे

फिरत जारे फिरत जा तू गंध होत फुलांचे

कोण तुझा आधार होऊनी नेईल त्या किनारी

सुख शोधत निघूनी जा तू तुझाच हात धरुनी

मिळेल तुलाही मार्ग हर्षाचा ध्येय तू ठरवून घे

साथ हवा तरी तुला रे कसला तूच तुझे बघून घे

विसरुनी जारे विसरुनी जा तू दूख जीवनाचे

वाहत जारे वाहत जा तू वारे होऊनी सुखाचे

दुख तर हे रीत जगाची कोण राहिला बाकी

दुख बघ जगाचे पहिले आणि हो तूही पुढारी

दुख पाहता लोकांचे मन कितीरे हा हादरतो

असेल अंत दुखालाही मग कशाला तू घाबरतो

विसरुनी जारे विसरुनी जा तू दूख जीवनाचे

हसवत जारे हसवत जा तू हर ते दुख जगाचे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational