विसरले मी जरी
विसरले मी जरी
विसरले मी जरी
तू मात्र विसरू नकोस
गुंतलेला जीव माझा
माझ्यापासून दूर जाऊ नकोस...
प्रेमवेडी मी राधिका रे
हरवून बसले तुझ्यात मी
चातकासम तृष्णा माझी
असते सदैव शोतात तुझ्या मी...
ओंजळभर क्षणिक सुख मागते
विसावा कधी कुशीत तुझ्या
विसरले मी जरी
मनमंदिरी राजसा तूच माझ्या...!!
