Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Jyoti gosavi

Classics Inspirational

4  

Jyoti gosavi

Classics Inspirational

विसर्जन

विसर्जन

1 min
332


बाप्पा तुझा निरोप घेताना

 डोळे ओले होतात

 कळत नाही दहा दिवस

 कसे निघून जातात


खरेच गरज आहे का रे 

या विसर्जनाची

 तू तर आहेसच  

देवता सृजनाची


हे तुझे येणे जाणे

 फक्त लोकांसाठी 

बाकी तू असतोसच

सदैव भक्तांच्या पाठी


 का तू दाखवतोस 

अशाश्वताची माया

 कितीही जमवली माया

 तरी शेवटी सारे वाया


किती करशील धावाधाव

 मानवा तुला कधी कळायचे

 मातीतून येऊन अखेर

 मातीलाच मिळायचे


मातीतून जन्मलेला गणपती

 पाण्यामध्ये विसर्जित होतो

 प्रत्येकाचाच देह अखेर

 पंचमहाभूतात विलीन होतो



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics