विरलीस का तू तेव्हा... ||
विरलीस का तू तेव्हा... ||
विरलीस का तू तेव्हा... ||
हरवलीस तू तेव्हा, सोडवत नसे पान्हा...
कोवळे जग बहरतांना,कुठे हरवला कान्हा...
विरलीस का तू तेव्हा... ||
इतुका स्पर्श मग जेव्हा, धीरास चाचपडतो...
इतुक्या जीवास आक्रंद, मुठिस अनावरतो....
विरलीस का तू तेव्हा... ||
नेत्रास आतुर वाट, निद्रेस अनावर होय...
अंगाई स्तब्ध ही आज, चांदोबा निमूट रडतो...
विरलीस का तू तेव्हा... ||
इतुके कान हे सुकले, मायेचा झरा आटतो...
किलबिलाट त्या चिमणेचा, सहज कापरा होतो...
विरलीस का तू तेव्हा... ||
जिवाभावाची आरास, दावतसे हसऱ्या भेटी...
बहुमूल्य क्षणांची साक्ष, आनंद शून्य भासतो...
विरलीस का तू तेव्हा... ||
गहिवरून ते पाखरू, नव्या चेहऱ्यांस घाबरते...
मिठिस हरवून बसते, आसवे हृदयी साठवते....
विरलीस का तू तेव्हा... ||
अविचारी हा काळ,दोष कसला निर्मळ कळीत...
निष्पाप रांगता जीव, सदैव शांत आक्रंदतो....
विरलीस का तू तेव्हा... ||
