विरह
विरह
नको ओल्या करू सखे
डोळा पापण्याच्या कडा
माझ्या पायघडी नको
घालू काळीज तुकडा
ऋतू आले गेले किती
नेम माझा ना चुकला
मात्र आताच्या घडीला
आत्मा देहाला मुकला
माझा गुन्हा मला मान्य
शिक्षा हवी ती भोगेंन
साथ तुझीच मिळावी
हेचि मागणे मागेंन
सखे आताच्या घडीला
नको आस लाऊ माझी
विसरुन जा तू मला
जग ज़िंदगानी तुझी
झाला जर जन्म दुजा
भेटू नव्याने सजनी
आण देतो तुला माझी
नको ओलावा पापणी
