विरह
विरह
सोसवत नाही आता मला
विरह तुझ्या - माझ्यातला,
अस झालय कधी विचारतोय
प्रेमाचा प्रश्न मनातला.
पण तू नाही म्हटले तर
ही मनात असते भीती,
याच विचारात अजून मी
मोजू तरी दिवस किती.
सारख्या त्याच विचारात माझा
एक एक दिवस निघतोय,
तू फक्त माझीच व्हावी
हे फक्त मी स्वप्नच बघतोय.
आज सर्व हिम्मत एकटवून
तुला मी आता विचारतोय,
आणि तुझे उत्तर हो असावे
याची मी मनापासून वाट बघतोय.