STORYMIRROR

Sumit Sandeep Bari

Abstract Classics Children

3  

Sumit Sandeep Bari

Abstract Classics Children

शाळेचा पहिला दिवस

शाळेचा पहिला दिवस

1 min
387

जुन्या आठवणींचा उजाळा केला,

मज एक आनंदी दिवस सापडला

आजही आठवतो मला तो दिवस,

१५ जून शाळेचा पहिला दिवस


कोरोनामुळे शाळेला लागले होते कुलूप,

चोहेकडील आनंद झाला होता गुळूप

आज अखेर शाळेला सुरुवात झाली,

शाळेची घंटा १५ जूनलाच वाजली


नवविद्यार्थ्यांना बघून मज बालपण आठवते,

बालपणीच्या आठवणींना उजाळा मिळते

मित्रांनो गेले ते दिवस राहिली फक्त आठवण,

या आठवणींची करतोय मी साठवण


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract