पाणी वाचवा, जीवन वाचवा...💧💧
पाणी वाचवा, जीवन वाचवा...💧💧
पाण्याच्या शोधात मानव चाललाय खोल खोल,
धरणीतून आवाज येतोय बस बाबा संपली आता ओल.
पाण्याचा गैरवापर करणे आपण टाळले नाही,
पाण्याच्या गैरवापरामुळे अखेर झालीना पाणी टंचाई.
जागेच्या नावाखाली झाडांचेही जीवन संपविले,
पाणी जिरविण्याचे सर्व मार्गच बंद केले.
पाण्याचा गैरवापरावर घेतली नाही खबरदारी,
पाण्याच्या समस्येची कोण घेईल जबाबदारी.
विकासाच्या नावाखाली नदी, समुद्र घाण केले,
पाणी वाचवा असे फक्त नारेच देत राहीले.
पाण्याविना जीवनसृष्टी येईल धोक्यात,
बघ राजा जातयं का काही तरी डोक्यात.
