STORYMIRROR

Nalanda Wankhede

Tragedy

3  

Nalanda Wankhede

Tragedy

विरह वेदनेचा

विरह वेदनेचा

1 min
568


विरह वेदना मनाची जगाला सांगू कशी

व्यथित हृदयाला सांग समजावू कशी

काळोख दाटला तनामनात माझ्या

स्वःताला मी सांग समजावू कशी


अरण्य झाले हृदयाचे

घोर जंगल भासे मज जीविताचे

उदास भावविहिन सुजले डोळे

गाळून गाळून अश्रू नयनाचे


रात्रीची गर्दी निशब्द भावनांची

दाटी आसवांची नेत्रात कोरडी पापणी

हुंदके येतात ओठात अन हृदयात जेव्हा

भासे मज डोहात मरणावस्थेत असल्यावाणी


बोलके प्रेम माझे विरहामुळे मूक झाले

काळीज माझे काढून तू पसार झाले

क्षणभंगुर आयुष्याला प्राणदान दे तू असा

बनुनी फुलपाखरू गिरक्या घेत जा तू जसा


कोरे विश्व स्वप्नांचे निमूटपणे कोरले मी

तुझ्याविना विरहाच्या भोगल्या वेदना मी

उडतं येरे काहू पाखरासारखा

जीव हा वेडापिसा रिकाम्या नभासारखा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy