STORYMIRROR

Vasudha Naik

Tragedy

4  

Vasudha Naik

Tragedy

विरह..... ~~~~~~~ नवखे म्हणून

विरह..... ~~~~~~~ नवखे म्हणून

1 min
459

नवखे म्हणून आपण

सारसबागेत भेटलो

भेट घडवून आणली दैवाने

नवखे आपण एकत्र झालो....


परस्परांना समजून घेतले

 एकत्र आणले कुटुंबाला

संसाराला सुरूवात झाली अन

नजर लागली सुखी संसाराला...


तू अचानक परदेशी गेलास

मी एकटीच इथे राहिले

विरहात तुझ्या आता मी

होरपळून जावू लागले.....


हनी इथे तर मून तिथे

अशी आपली अवस्था झाली

घरादाराचा सांभाळ करताना

तुझ्या आठवणीत रमू लागली....


तुझ्या अन माझ्या प्रेमाला

सतत मी स्मरण करतेय

अन मुलाबाळांच्या समवेत

व्हिडिओ काॅलवर तुला पाहतेय....


छंद जोपासते आता आगळावेगळा

कविता अन चारोळीचा

विरहात तुझ्या आता मला

दिवसही जातो आनंदाचा.....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy