विजय पताका
विजय पताका
1 min
250
कार्य जेंव्हा तडीस जातो
द्वेष आपुल्याच जणांचा
स्तुती करणे तर सोडाच
सदा प्रयत्ने व्यतयाचा...!
स्वतः काही जमत नाही
पुढच्याचे यश खपत नाही
देण्या कष्ट धजावती पुढे
शिवाय त्या जमत नाही...!
अख्ख्या कर्माच्या क्षेत्री
कुटील कारस्थान रणनीती
उंच कळस गाठताना
आड असुरी प्रवृत्ती...!
संघर्ष दोन वृत्तीचा
संहार द्वेष कृतीचा
अवकाशाने का मिळेना
पण,विजय असे सत्कृतीचा..!