STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational

4  

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational

विज्ञान-गीत

विज्ञान-गीत

1 min
934

विज्ञानाच्या जोरावर साधली प्रगती एक आगळी 

विज्ञान आहे खरी जादू समजून घ्या हो मंडळी 


सूर्य, चंद्र, तारे मानले जाते विश्वात मानवांचे ईश्वर 

त्याच चंद्रावर पहिले पाऊल, मानवाने घडवला चमत्कार 


मानवाच्या गरजेपोटी, शोध सुरू झाला अंतराळात 

त्यात बलिदान अंतराळवीर कल्पना चावलाचे नासात 


शूरता, वीरता तिच्या खऱ्या लाभलेल्या बलिदानात 

सर्व महिलांसाठी तिचा आदर्श महिलादिनी जगभरात 


विद्यार्थी, विद्यार्थीनींसाठी नवनिर्मितीची चेतना 

गाऊ या विज्ञानदिनी गाणे, देऊन त्यांना प्रेरणा 


तांत्रिकी, अभियांत्रिकी शिक्षण भारताला लाभले वरदान 

जगात विखुरले शास्रज्ञ भारताचे, राखली भारताची शान 


शोधांची जननी, विज्ञानाचे माहेरघर नाव जगात भारत 

सर्व सुखी संपन्नतेचा शिकविते धडा आपल्या मातृभूमीत 


सत्याचा अाविष्कार, प्रात्यक्षिकावर सतत असते भर 

त्याला सिद्धांताची जोड, करूनी असत्यावर प्रहार 


चिंतन, मनन, वाचन, विज्ञानाच्या जोडीला खरे साथीदार 

प्रयत्नाशिवाय नाही शोध, जगातील एक सत्य खरोखर 


जिज्ञासा, इच्छाशक्ती, असावी दांडगी बालमनात 

बालशास्रज्ञ घडविणारे शिक्षण असावे अखंड जगात 


हीच खरी देशाची संपत्ती, देशाचे उज्ज्वल भविष्य 

तरच जगाला मिळेल चांगले सुख, शांतीचे आयुष्य 


सर्व विषयांचा सार, बुद्धीस मिळते कायम चालना 

मंत्र जगाला दिला श्रेय आपल्या भारतीय शास्रज्ञाना 


सर्व तारे, ग्रह, उपग्रह, लघूग्रह, बटूग्रह, अखंड साक्षीदार 

विज्ञानाच्या अभ्यासातून जगाने गाठले यशाचे शिखर 


भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम मिसाईलचे जनक 

पाहून त्यांचे अनमोल कार्य होतो आम्ही नतमस्तक


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational