वीरमाता
वीरमाता
मराठा सरदार भोसल्यांचा
जाधवांची लेक गुणी धैर्याची
झाला जन्म थोर शिवबाचा
गाजवी पराक्रम शौर्याची ॥१॥
जिजामातेच्या शिकवणीतून
घडे शिवबाची शूरता
पाहे स्वराज्य स्वप्नातुन
सत्य करून दाखवे वीरता ॥२॥
इच्छा ऐकुणी जिजाईंची
ना करेन चाकरी दुसऱ्यांची
स्थापिन स्वतःचे स्वराज्य
घेऊन साथ मावळ्यांची ॥३॥
घडवून शूर शिवछत्रपती
वीरकन्या बनली वीरमाता,
हिंदवी स्वराज्य स्थापून
वीरआज्जी बनली राष्ट्रमाता ॥४॥
आजही देई मानेचा मुजरा
धन्य ती राजाची जनता.
जी ने घडविला महान शिवबा
धन्य धन्य ती वीर माता ॥५॥
