वीर सुता
वीर सुता
भारत भूमीच्या रक्षणास
दिले प्राणांचे हो बलिदान
रक्ताने अभिषेक दिलास
देशभक्त शहिद जवान
वृद्ध बाबा तुझी जन्मदात्री
कर्तव्यदक्ष तू भू-रक्षणा
पत्नी, मुले ही जबाबदारी
प्राधान्य तुझे सीमारक्षणा
आहुती प्राणाची भूमातेस
सहज वाहिली तू जवाना
पराक्रमाने तू नमवलेस
रणांगणात अनेकांना
निर्भय आम्ही राहावे घरी
सलाम तुला जीवनज्योती
दिवा पेटावा हा दारोदारी
विझली तुझी रे प्राणज्योती
नमन करी हा सारा देश
तुझ्या या आहुतीस रे सदा
भारतमातेच्या वीर सूता
सलाम तुला पुन्हा एकदा
