विघ्नहर्ता
विघ्नहर्ता
आज संकष्टी चतुर्थी
विघ्नहर्ता करू स्मरण,
सौख्याची पायघडी
होई दुःखाचे हरण...
मोदकाच्या ताटात
हराळीची जुडी शोभे,
मनमोहक रूपातून
सौख्य दारी ऊभे...
आराधना बाप्पाची करू
मनी-चित्ती लंबोदर,
पूजन करूनी आराध्याचे
कार्य पूर्णत्वास हर...
चंद्रोदय होताच पूजन
षडषोपचार करावे,
तांदळाच्या राशीतूनी
गणरायास भजावे....
मनोभावे प्रार्थना करता
कृपादृष्टी त्याची होई,
क्षणोक्षणी जीवनात
दाहकतेचे शमन होई
