विचारांचे प्रदूषण !
विचारांचे प्रदूषण !
प्रदूषण करते जग सर्व दूषित
असो काहीही, स्वच्छ सुरक्षीत
अन्न असो की स्वच्छ हवा
मिळताच त्यात भेसळ पहा
दूषित होऊन खराब होई
स्वत: बरोबर दुसऱ्यास खाई
अन्नाचे ही तसेच असते
भेसळ होता ते दूषित होते
भक्षण मग होता तयाचे
प्रकृतीस ही अपाय करते
शुद्ध हवेची तशीच खेळी
कारखाने, गाड्या धूर जाळी
प्राणवायू मध्ये मिसळून जाता
अशक्त हृदये करून सोडी
पाण्याचे ही जणू नसे वेगळे
दूषित रसायने त्यात मिसळता
आरोग्याची होते मग हालत
मात्रा औषधांची नाही चालत
विचारांचे तसेच भयंकर प्रदूषण
अविचार रूजती सदैव लवकर
संस्कृतींत ते घालती विरजण
सहीष्णूततेची करती बोळवण
त्याग, संयम, आपुलकी भावना
शांती, समाधान प्रदूषित बनवी
राग, मत्सर, दहशतवादी कामना
समाजात त्यांचे विषाणू पसरवी
पाणी, हवा, अन्नाचे प्रदूषण
आटोक्यात ही येईल कदाचित
परंतु विचारांचे तेच प्रदूषण
समाजा सह देशासही घातक !!
प्रदूषण करते जग सर्व दूषित
असो काहीही, स्वच्छ सुरक्षीत
