STORYMIRROR

Chaitali Ganu

Tragedy Inspirational

4  

Chaitali Ganu

Tragedy Inspirational

विभिन्न

विभिन्न

1 min
538


ती

बाईच्या हृदयाची

पुरुषाच्या शरीराची

तरीही बाईच

ना वेगळं लिंग

ना वेगळ्या भावना

पण तरिही पुरुषी

काय असेल नेमकं वेगळं त्यात

जरा मुलीसारखी वाग

मोठं मोठ्याने हसणं

जमत नाही लाजण

तरीही कोमल हृदय 

प्रेमाचं 

समजून उमजून घेईल का तो

असेल का स्त्रीचं हृदय

त्याच्या पुरुषी शरीरात

आणि भेटतील हे कुठे

ठरवतील काय दोघात

शरीराच्या पलीकडे 

भेटतील का तिच्यातला तो

आणि त्याच्यातली ती 

आज....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy