विभागणी
विभागणी
मातृभूमीला स्वतंत्र केले बलीदान देऊन
ज्यांनी जाती धर्म निर्मुलनापायी आयुष्य वेचले ज्यांनी
जयंती पुण्यतिथीची होतेय जातीनिहाय विभागणी
ज्ञान सुर्य जगाचा. लौकिक भीमराव आंबेडकरांचा आहेत म्हणे ते महारांचेच नेता
लोकशाहीर आण्णाभाऊंवर हक्क आहे मागांचा
टिळक सावरकरांना घरोबा ब्राम्हणांचा अधिकार सांगतोय मराठा शिवबा फक्त आमचा
स्वार्थ सत्तेचा मिळवण सोईस्कर होतं झेंडे तयार
आमचे नाव सांगा फक्त ""जातीचं ""तिरंगयाला सकतीने
स्वातंत्र्य दिनालाच मान बाकी तर आम्हा झेडयांच्या रंगाचा अभिमान
निळा अमचा पिवळा तुमचा भगवा यांचा हिरवा त्यांचा
विसरले निरलज्ज शंढ, रंग एकच होता बलीदानांच्या रकताचा
स्वातंत्र्याने जगणे हक्क प्रत्येक जीवाचा
आरक्षण,सुविधा योजनांचा लाभ मिळवाया लढत राहू
सत्ता पिपासू मातृभूमी ची बोली लावू
कर्तव्यच्या मसुद्यांना केरात भीरकाऊन देऊ
एकजुटिने लढले विसरून घरदार देहभान हसत चढले फाशी संकुचित केलेय
त्याच्या त्यागाला बाटवून धर्म जातिशी
विज्ञान युग आहे अजुनही अंधश्रद्धेच्या विळखयात निर्भिड पणे
कुणि केलाच विरोध गोळी छाताडात भर रस्त्यात
आठवा असेल चाड जरा तया पुण्यस्वरूप शुरवीरांची
सत्तेत गरज असते निष्कलंक शासनाची
पहा जमले तर थांबवायला वाटणी शहिदांची समाज सुधारकांची
हिम्मत ठेवा निरपेक्ष,पारदर्शक,समानतेने कारभार करण्याची
