व्हॅलेंटाईन डे
व्हॅलेंटाईन डे
किती दिवस
नुसतं बघायचं
प्रेमाला आपल्या
दाबून ठेवायचं
व्यक्त करू
मनातील भावना
हीच माझी
आहे कामना
व्हॅलेंटाईन दिवशी
दे होकार
करू मग
स्वप्न साकार
नको मला
भेटवस्तू महागड्या
प्रेम तुझे
हवे सवंगड्या
साथ हवी
तुझी मला
वचन देते
आज तुला