STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Romance

4  

Meenakshi Kilawat

Romance

चंद्रकळा टिपक्याची

चंद्रकळा टिपक्याची

1 min
365

 नेसली मी आज साडी ,चंद्रकळा टिपक्याची 

 पैठनी माझी भरजरी ,ही रेशमी धाग्याची

नको पदर ओढू सजना,माझी कोमल कांती.!!

तूला आहे शपथ प्रिया, माझ्या प्रेमाची ....


करण कुंडल कानात बोलती 

 कंकन पाटल्या बाजूबंद हाती

नको हात ओढू सजना,माझी कोमल कांती .!!

तूला आहे शपथ प्रिया, माझ्या प्रेमाची ....


पायाचे पैंजन किनकिन करती

जोडवी बोटातील बडबड करती

नको रास खेळू सजना , माझी कोमल कांती.!! 

तूला आहे शपथ प्रिया, माझ्या प्रेमाची ...


हा वेणीतील मोगऱ्याचा सुगंधी गजरा

 करी धुंद आसमंत मनाचा सारा

झरोक्यातून बघे चंद्र तारका नजारा

नको छेडू सजना माझी कोमल कांती.!!

तूला आहे शपथ प्रिया, माझ्या प्रेमाची ....


कदर जाण प्रिया,तू माझ्या प्रेमाची

कसली ही गोडी मी नाही परी गुणाची

तुझी छाया माया मज वेड लाविती

लाज येई मला भारी,माझी कोमल काती.!!

तूला आहे शपथ प्रिया, माझ्या प्रेमाची ....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance