STORYMIRROR

Riya Lotlikar

Romance

4  

Riya Lotlikar

Romance

बेधुंद

बेधुंद

1 min
405

आवडायची तिला फुले....

अगदी रातराणीही छान बहरली असेल ना ,

तरीही दोन पावलं मागे वळून,

दीर्घ श्वास घेऊन,

मग पुढे जायची ती,

म्हटले मी कधी जर,

घे ना मग एखादं फुलं खुडून

तर म्हणायची.....

नको रे, ती झाडांवरच सुंदर दिसतात


मग आणू का तुझ्यासाठी

छान सुवासिक मोगऱ्याचा गजरा

तर हसून म्हणाली

छे रे, आहेत कुठे एवढे लांब केस

गजरा माळायला


म्हणून मग एकदा ना,

आणली बकुळीची फुले ओंजळीत धरून

तर केवढी खुलली कळी तिची,

ठेवून परडीत ती फुले

घेऊन दोन्ही हात माझे

स्वतःच्या गालांवर ठेऊन

म्हणाली कशी,

होऊ दे ना मलाही धुंद अशीच

जशी आणलीस ही नाजूक फुले हातात धरून.....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance