STORYMIRROR

harshada joshi

Romance

4  

harshada joshi

Romance

भेट तुझी माझी

भेट तुझी माझी

1 min
509

झाले आता वय लग्नाचे 

कांदेपोह्यांना उधाण आले 

हजार पत्रिका नि प्रस्तावांनी 

टेबलावर थैमान घातले 


काहीच कळेना त्या वळणावर 

मन सुन्न बेभान झाले 

साद घालावी कोणास कळेना 

बुद्धिमान कैक धनवान आले 


बांधली जिथे गाठ होती 

मनामनाचे संधान झाले 

आस होती ज्याची मनाला 

हृदयाचे ते दर्पण झाले 


आयुष्याच्या त्या वळणावर 

डोळ्यातून सन्मान कळवले 

जीवनाच्या पुस्तकातले 

हवे हवे ते पान मिळवले 


लागली गोडी तुझी सख्या रे 

सोनसरीत सारे श्रावण फुलले 

नाही राहिले उणे अताशा

तारकांनी माझे अंगण खुलले


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance