STORYMIRROR

Sharad Kawathekar

Romance

4  

Sharad Kawathekar

Romance

शून्य

शून्य

1 min
425

शून्यातूनच आलो आणि शून्यातच 

जाणार हे माहिती असूनही 

नातं कुणाशी जोडाव ह्या द्वंदातच अडकून पडलो

एका बाजूला दुःखाचा डोंगर तर

दुसऱ्या बाजूला सुखाची खाई

अश्या पावसाळी वणव्यात

सतत पेटतच राहीलो


आता वाटही हुंदक्याची थकून गेलीय

आणि त्यामुळेच सगळी आठवणींची

लक्तरं मी गावकुसाच्या वेशीवरच

मी आनंदाने टांगून ठेवलीयत...


आणि अचानक 

पावलं काळजरेषेच्या उबंरठ्यावरच अडखळली

आकाश कवेत घेण्याचं बळ आलं 

हरवलेल्या क्षणांना पुन्हा एकदा 

कवेत घेतलं त्याला आंजारलं गोजारलं


आणि तुझ्या गहिऱ्या डोळ्यांत माझं जग

पुन्हा एकदा बुडालं

देण्या घेण्याचे ओलसर भावतरंग उठले 

आणि तू 

शब्दाच्या पोकळीत अंग चोरून उभी होतीस 

आणि मी मात्र दोन शुन्यांच्या पोकळीत अडकून पडलो ...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance