प्रेमाची मोडी
प्रेमाची मोडी
ये ना प्रिया जरा , माझ्या जवळ तू
नकोस ना असा , सतवू मला तू
घे हातात हात , कधी सोडवू नकोस तू
रहा शेवट पर्यंत , सदा माझाच तू
न करू तक्रार , न कधी होऊस नाराज तू
आनंदी राहू हमेशा , करू प्रेम निस्वार्थ मी अन् तू
जगच बदलून गेलं , जेव्हा आलास आयुष्यात तू
जीवन असू शकत सुंदर , दाखवून दिलंस तू
बदल जो घडला , समजण्या मदत केलीस तू
छान वाटतय सगळ , जोडीला मज हवास तू
एका वेगळ्याच मोडीत , गुंतवूनी ठेवलयस मला तू
अस हे सुरेख प्रेम , यात फक्त मी अन् तू

