तू आणि मी
तू आणि मी
भेटली तू मला वादळासारखी
वाळवंटातल्या ओहळा सारखी
वाहता धबधबा मी जसा साजणी
तू किती निश्चल कातळा सारखी
देवता तूच माझी तुझा भक्त मी
वाटते तू मला देवळा सारखी
नयन आहे तुझे मासळी सारखे
नेत्र मी तू मला काजळा सारखी
पंकजा सारखे फूल मी शोभतो
तूच सपनात निल कमळा सारखी