क्षणात ये
क्षणात ये
कधीतरी असाच ये
मला न सांगताच ये
तुलाच हाक मारते
निनाद ऐकताच ये
तुझ्याविना कशी जगू
निरोप भेटताच ये
विशाल वाळवंट मी
तहान लागताच ये
फुलास दुःख केवढे
गुलाब पाहताच ये
हसून दुःख झाकते
मनास वाचताच ये
सदैव काळरात्र मी
दिव्यास शोधताच ये
ठिसूळ आरसाच मी
न फोडताच काच ये