STORYMIRROR

varsha naik

Romance

4  

varsha naik

Romance

सांजकाहूर..

सांजकाहूर..

1 min
502


अवचित कशी सांजेला.. वाटे वेडी हुरहूर

कोड्यात पडते मन..अन् डोळ्यात वाढते काहूर


सुखाच्या ताऱ्यांचा जरी नभास येई पूर..

तरी दूर एक चांदणी..भेटण्या चंद्रास आतूर


अधीर निशेवर चढती तेव्हा मोरपिसांचे शहारे

धुंद तिच्या स्वप्नांना उरती कुठे किनारे..


पहाटेची लाट मग पापण्यांवर येई

मधुर भास विरघळण्याची तरी नसे घाई..


दिसे अलवार मग कवडसा सोनेरी..अन् स्वप्नभास होती खरे

सुटे मनाचे कोडे ..अन् काहूर मागे उरे।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance