पाऊसवेळा..
पाऊसवेळा..
1 min
175
अशी ओल दाटून येता मनी.. नभी सावळे मेघ हे दाटले..
अशी साद येता वाऱ्यावरी.. दूर सागरी थेंब ओथंबले..
कसा कोण जाणे तोल गेला ढगांचा..
कसा लख्ख झाला..रोख वेड्या विजांचा..
आल्या हळव्या माहेरी.. मग सरींवर सरी..
सरल्या दुःखवेणा साऱ्या..झाली पाने थेंबबावरी..
बेभान झाली पाऊले.. दिसले आरसे पाणीयाचे
माझ्या ओलसर मनासवे.. हे प्रतिबिंब आणि कुणाचे?!!!
