STORYMIRROR

varsha naik

Classics Romance

3  

varsha naik

Classics Romance

..कशी सांगू..

..कशी सांगू..

1 min
751


किस्से..कथा ..कविता

आणि कशात सांगू..

गोष्ट तुझी माझी..

शब्दात कशी मांडू..


एकदा नजर भेटता

जिथे मौनही होते बोलके..

मनातले सांगायला

तिथे संवाद कशास शोधू..


नाही अंतर आठवांत

दोन श्वासांइतकेही..

अंतरातच दिसता रोज तू..

डोळ्यातूनी आणि काय पाहू..


ओळख हि नाहीच आजची..

आस तरीही सात जन्मांची..

वेडातच असे सुख सारे..

शहाणपण आणि कशास मिरवू..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics