तू..
तू..
तूच आहेस ना...ते ऊन
भिजली श्रावणधारा
धुक्यातलं चांदणं..
आणि नकळता शहारा...
वहीतले पिंपळपान तू..
न सुचलेली कविता..
तूच जुन्या नव्या जाणीवा..
आणि प्रत्येक श्वास उमलता..
खऱ्याखुऱ्या स्वप्नात
भासातल्या सत्यात तू
ओळखीतही अनोळखी
तरी न दिसता मनात तू..।।