STORYMIRROR

varsha naik

Romance

4  

varsha naik

Romance

दुरावा

दुरावा

1 min
606

वेगळ्या वाटा.. तरी सोबतीने चालणे

नाते कोणते हे.. दुराव्यातही देखणे


आठवांत तुझ्या.. माझी लवते न पापणी

ठेच मला अन कळ तुला जीवघेणी

माझे हसण्याचे कारण.. तुझे स्वप्नातले भेटणे..

नाते कोणते हे.. दुराव्यातही देखणे


माझी मी विरूनही माझ्यात उरतोस तू..

गर्दीतूनी साऱ्या.. हवाहवासा एकांत तू..

नाव गुंफूनी तुझे.. कवितेचे होते गाणे..

नाते कोणते हे.. दुराव्यातही देखणे


मी रंग गहिरा तुझ्या हळव्या सांजेचा

तू चांद माझ्या एकाकी निशेचा..

विरहाच्या उन्हातही बरसे प्रीतीचे चांदणे..

नाते कोणते हे.. दुराव्यातही देखणे..! 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance