STORYMIRROR

varsha naik

Inspirational

4  

varsha naik

Inspirational

मन ..

मन ..

1 min
350

मन.. ऐकतच नसतं कधी कुणाचं

कधी हसतं..कधी रूसतं..

वर्तमानात मात्र कधीच नसतं..

सारखं फिरतं स्वप्नात..

हवं ते मिळवतं..

गमावलेलं सापडतं..

मनही मग जगतं मनापासून..

सोडवतं प्रश्न.. सुरुवातीपासून...


कधी कधी मात्र रमतच नाही कुठे..

न जाणे असतं गुंतलेलं कुठे..

ना अंतरात ना बाहेर..असतं दूर अनोळखी जगात..

निसटलं सारं हातून तरी..

उरतं खोल काही.. मनाच्याही मनात..


कधी एकांतात हुरहूरतं..

कधी गर्दीतही तगमगतं..

खरं खोटं..भलं बूरं..

कळलं तरी ना वळतं..

सावरलं कितीदा तरी..

सारखं भासांना भूलतं..


दाटून येतं कधी कधी ..

मनाच्या गावात..

वरवर दिसलं नितळ तरी..

आत गहिरं.. हळवं होत जातं..


मनाला वाट्टेल तसं वागतं मन ..

सल मात्र काळीज सोसतं..

हातीच येत नाही वेडं..

कोणाच्या मनी जाऊन दडलयं..

त्यालाच ते ठाऊक असतं..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational